90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री काजोल आज (5 ऑगस्ट) तिचा 48वा वाढदिवस साजरा करत आहे.



1974मध्ये जन्मलेली काजोल ही एक सुंदर बॉलिवूड अभिनेत्री आहे, जिने या इंडस्ट्रीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत.



मुळातच चित्रपटांची कौटुंबिक पार्श्वभूमी असणाऱ्या काजोलला देखील बालपणापासून अभिनयाची आवड होती.



वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी मनोरंजन विश्वात पदार्पण करत काजोलने प्रेक्षकांच्या मनात आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे.



1992मध्ये तिने 'बेखुदी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यावेळी ती फक्त 16 वर्षांची होती.



दोन महिन्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत शूटिंग करेन आणि नंतर शाळेत पुन्हा परतेन, असा निर्धार करून तिने चित्रपट स्वीकारला. मात्र, या चित्रपटानंतर तिने शिक्षण सोडले आणि पूर्णवेळ करिअर करण्यावर लक्ष केंद्रित केले.



1995मध्ये, काजोलचे ‘करण-अर्जुन’ आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे दोन चित्रपट बॅक टू बॅक हिट ठरले.



‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटासाठी काजोलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला.



काजोलने तिच्या बॉलिवूड करिअरमध्ये अनेक उत्तम चित्रपट केले. ‘गुप्त’ चित्रपटात काजोल नकारात्मक भूमिकेत दिसली होती तिचे हे पात्रही लोकांना खूप आवडले होते.



‘गुप्त’ या चित्रपटातील नकारात्मक भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.