बॉलिवूड अभिनेत्री काजोल हिने चित्रपटसृष्टीतील तीस वर्षे पूर्ण केली आहेत.
सुमारे तीन दशकांच्या कारकिर्दीत काजोलने एकापेक्षा एक उत्तम चित्रपट दिले आहेत.
काजोलने 'बेखुदी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
'बेखुदी' हा चित्रपट 31 जुलै 1992 रोजी प्रदर्शित झाला होता.
तेव्हापासून काजोलने अनेक अविस्मरणीय चित्रपट दिले आहेत.
यामध्ये 'बाजीगर', 'दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे', 'गुप्त', 'प्यार तो होना ही था', 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'फना', 'ताना जी' यांसारख्या संस्मरणीय चित्रपटांचा समावेश आहे.
बॉलिवूडमध्ये 30 गौरवशाली वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काजोलने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांचे आभार मानले आहेत.
काजोलने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये काजोलच्या तीस वर्षांच्या प्रवासातील निवडक चित्रपटांचा समावेश आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या चित्रपटांची झलक आहे.