बॉलिवूडची ‘परम सुंदरी’ अर्थात प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनन आज (27 जुलै) आपला 32वा वाढदिवस साजरा करत आहे.



क्रितीने आत्तापर्यंत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. तिने अनेक हिट चित्रपटही दिले आहेत.



मनोरंजन विश्वाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही क्रिती सेनन आजच्या काळात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.



सोशल मीडियावरही क्रिती सेननची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे आणि तिने तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.



क्रिती सेननच्या हातात आज अनेक मोठे चित्रपट असले, तरी तिचा सिनेजगतातील प्रवास सोपा नव्हता.



क्रिती सेननचा जन्म 27 जुलै 1990 रोजी दिल्लीत झाला. तिचे वडील राहुल सेनन हे सीए आहेत. तर, आई गीत सेनन दिल्ली विद्यापीठात प्राध्यापिका आहेत.



दिल्लीत जन्मलेल्या क्रिती सेननने नोएडा येथील कॉलेजमधून बीटेकची पदवी पूर्ण केली आहे.



तिने आपल्या करिअरची सुरुवात साऊथ चित्रपटांमधून केली होती. सुपरस्टार महेश बाबूसोबत क्रिती सेनन पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली होती.



तेलुगू सायकोलॉजिकल थ्रिलर 'नेनोक्कडाइन' हा क्रितीचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटासाठी क्रिती सेननला समीक्षकांकडून खूप कौतुकही मिळाले.



'नानोक्कडाइन' 2014मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर क्रिती सेननने बॉलिवूडकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे.



Thanks for Reading. UP NEXT

हिना खानचे बोल्ड फोटो पाहिले का?

View next story