बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते.



आज म्हणजेच 1 मे रोजी अनुष्का तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे.



अनुष्काने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. लेक वामिकाच्या जन्मानंतर ती चित्रपटांपासून दूर होती.



अनुष्काचे शालेय शिक्षण बंगळुरू येथील आर्मी स्कूलमध्ये झाले असून, अनुष्काचा भाऊ कर्णेश शर्मा मर्चंट नेव्हीमध्ये काम करतो.



तिने माउंट कार्मेल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. कला शाखेची पदवी घेतल्यानंतर अनुष्काने अर्थशास्त्रात एमए केले आहे.



अनुष्का शर्माच्या करिअरची पहिली पसंती पत्रकारिता होती. पण, संधी मिळाली आणि अनुष्काचं मनोरंजन विश्वात पदार्पण झालं.



दिवंगत फॅशन डिझायनर वेंडेल रॉड्रिग्स यांनी अनुष्काला एका मॉलमध्ये काही समान खरेदी करताना पाहिलं. त्यांनी तिला मॉडेलिंग करण्याविषयी विचारलं, ज्यावर तिने लगेच होकारही दिला.



इथूनच तिचे मॉडेलिंग करिअर सुरू झाले. मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी ती मुंबईला आली. त्यानंतर अनुष्काने 2008मध्ये 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून पदार्पण केले.



मात्र, तिचा हा चित्रपट फ्लॉप झाला. या चित्रपटानंतर, ती यशराज बॅनरच्या ‘बॅंड बाजा बारात’ आणि ‘जब तक है जान’ या चित्रपटांमध्ये दिसली आणि या दोन्ही चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला.



अनुष्का फिल्मी कुटुंबातील नसून, तिने स्वबळावर चित्रपटांमध्ये यश मिळवले. अनुष्काने हे यश मिळवण्यासाठी खूप संघर्ष केला आहे.



Thanks for Reading. UP NEXT

1 मे : जाणून घ्या आजचे राशीभविष्य

View next story