बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लाडकी लेक इरा बॉयफ्रेंड नुपुर शिखरेसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

इरा खान आणि नुपुर शिखरे यांचा लग्नसोहळा मुंबईतील ताज लँड्समध्ये होणार आहे.

महाराष्ट्रीयन आणि रजिस्टर पद्धतीने त्यांचं लग्न होणार आहे.

लग्नानंतर एका खास रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे.

या लग्नाला 900 पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

इरा आणि नुपुर यांच्या लग्नसोहळ्याला खान आणि शिखरे यांच्या कुटुंबातील जवळचे मंडळी उपस्थित असणार आहेत.

13 जानेवारी रोजी पार पडणाऱ्या रिसेप्शन पार्टीलादेखील मोठ्या संख्येने सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.

सायरा बानो आणि सलमान खान यांच्या घराबाहेर इरा आणि नुपुरला स्पॉट करण्यात आलं आहे.

नुपुर आणि इरा एकमेकांसोबत खूप आनंदी आहेत.

इरा आणि नुपुर यांचा साखरपुडा मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात इटलीमध्ये झाला होता.