मराठी बिग बॉस सीझन 3 फेम अभिनेत्री सोनाली पाटील सोशल मीडियावर प्रंचड सक्रिय आहे. ती नेहमी आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच सोनाली पाटीलने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. यात तिने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. कोल्हापूरची मुलगी म्हणून सोनालीने बिग बॉसच्या घरात आपली ओळख बनवली. सोनाली पाटील सध्या तिच्या या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. या पांढऱ्या गाऊनमध्ये सोनाली पाटील खूप सुंदर दिसत आहे. सोनालीचे हे सुंदर फोटो फोटोग्राफर तेजस जगताप यांनी क्लिक केले आहेत. सोनाली पाटीलने तिच्या या अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. पाहा सुंदर फोटो...