बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री भूमी पेडणेकर आज (18 जुलै) आपला वाढदिवस साजरा करत आहे.



भूमी अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत आणि लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे.



स्टार किड किंवा मनोरंजन विश्वाची पार्श्वभूमी नसतानाही भूमीने बॉलिवूड विश्वात वेगळी छाप सोडली आहे. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर भूमीने काम करण्यास सुरुवात केली होती.



वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी अभिनेत्री भूमी पेडणेकर हिचे पितृछत्र हरपले होते. भूमीच्या वडिलांचे कर्करोगाने निधन झाले होते.



या दीर्घ आजाराशी वडिलांना झुंजताना पाहणे त्यांच्यासाठी खूप कठीण होते. वडिलांच्या निधनानंतर भूमीचे संपूर्ण कुटुंब कोलमडून गेले होते.



मात्र, या कठीण काळातही त्यांनी स्वतःला सावरले. भूमीच्या आईने संपूर्ण कुटुंबाला एकसंध बांधून ठेवले. भूमीचे वडील देवाघरी गेल्यानंतरची दोन वर्ष त्यांच्यासाठी अत्यंत हालाखीची होती.



अभिनेत्री होण्याआधी भूमीने यशराज फिल्म्ससाठी शानूची असिस्टंट म्हणून काम केले होते.



भूमी पेडणेकर हिने आयुष्मान खुराना अभिनीत ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटातून भूमीने मनोरंजन विश्वात पदार्पण केले.



'दम लगा के हैशा' या चित्रपटात भूमी स्वत: सहाय्यक दिग्दर्शक होती. या चित्रपटासाठी 100 मुलींनी ऑडिशन दिले होते.



पण यातील एकही मुलीचे सिलेक्शन झाले नाही. यानंतर भूमीने स्वतः काही सीन करून मुलींना समजावण्याचा प्रयत्न केला. पण, तिचा अभिनय कास्टिंग टीम आणि दिग्दर्शकाला इतका आवडला की, या चित्रपटात भूमीलाच कास्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.



Thanks for Reading. UP NEXT

हॅप्पी बर्थडे प्रियांका चोप्रा!

View next story