बॉलिवूडची लाडकी ‘देसी गर्ल’ आज 40 वर्षांची झाली आहे. आज (18 जुलै) प्रियांका चोप्रा तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे.



बरेलीतून बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी प्रियांका चोप्रा आता एक ग्लोबल स्टार बनली आहे.



एका छोट्या गावातून आलेल्या या मुलीने स्वतःसाठी मनोरंजन विश्वात स्वतःचे हक्काचे स्थान तयार केले आहे.



प्रियांका चोप्राचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिचे बालपण जमशेदपूरमध्ये गेले.



मनोरंजन विश्वात प्रियांका चोप्राने अतिशय मेहनतीने हे स्थान मिळवले आहे.



2000 साली ‘मिस वर्ल्ड’ बनल्यानंतर प्रियांकाने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा विचार सुरू केला.



तिने 2003 मध्ये सनी देओलसोबत 'द हीरो' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.



यानंतर तिने सलग हिट चित्रपट द्यायला सुरुवात केली. 'दोस्ताना' चित्रपटातून प्रियंका चोप्राला ‘देसी गर्ल’चा टॅग मिळाला होता.



यानंतर प्रियांका चोप्राला हॉलिवूडमधून ऑफर आली. हॉलिवूडमध्ये तिने 'क्वांटिको' आणि 'बेवॉच'सारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले.