केसांची गळती किंवा वाढ न होणे अशा केसांसबंधित समस्यांना अनेक जण त्रस्त आहेत.

आज आम्ही तुम्हाला यावर उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची केसांच्या समस्येपासून सुटका होईल.

केसांना आवळ्याचं तेल लावल्याने केस वाढीसाठी मदत होते.

आवळ्यामधील व्हिटॅमिन ई केसांच्या वाढीसाठी मदत करते.

आवळा तेलाच्या वापराने केस दाट आणि चमकदारही होतात.

कांद्याचा रस केसांसाठी लाभदायक आहे. यामुळे केस लांबलचक होतील.

कांद्याचा रस किमान 20 ते 25 मिनिटे केसांला लावून ठेवा आणि नंतर शॅम्पूने केस धुवा.

दही हेअर मास्क वापरल्याने केस अतिशय मुलामय होतात आणि यामुळे केसांना आवश्यक पोषणही मिळते.

दह्यामध्ये असणारे प्रोटीन केसांना मजबूत बनवून त्यांच्या वाढीसाठी मदत करते.

नारळाचे तेल केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.

नारळाचं तेल कोमट करुन त्याने केसांना 5 मिनिटे मालिश केल्याने केस वाढण्यास मदत होईल.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातील काही उपाय तुम्ही याआधीही वाचले असतील.

पण, हे उपाय योग्य रितीने आणि सातत्याने करणं आवश्यक आहे.

फक्त एक किंवा दोन वेळा हे उपाय केल्याने तुम्हाला जास्त फरक जाणवणार नाही. त्यानंतरही उपाय सुरु ठेवा.

तुम्ही सातत्याने या उपायांचा अवलंब केल्याने तुमच्या केसांसंबंधित समस्या नक्की दूर होतील.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.