आपण अनेक तास कामाच्या गडबडीत पाणी न पिता राहतो. उन्हाळ्यात अनेकांना प्रचंड घाम येतो, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता उद्भवू शकते, ज्यामुळे डिहायड्रेशन होते.
प्रत्येकाने सकाळी उठल्यावर विशेषत: उन्हाळ्याच्या हंगामात पाणी प्यावे, त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते.
सकाळी उठून सर्वप्रथम पाणी प्यायल्याने किडनी स्टोनचा धोका कमी होतो. सकाळी पाणी प्यायल्याने पोटातील आम्ल शांत होण्यास मदत होते आणि स्टोन बनत नाही.
सकाळी उठल्याबरोबर पाणी पिण्याची सवय लावली तर चयापचय आणि पचनक्रिया वाढते. त्यामुळे उठल्याबरोबर कमीत कमी दोन ग्लास पाणी प्यावे.
जर तुमची त्वचा निस्तेज होत असेल तर उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी प्यायले पाहिजे.
पाण्यामुळे रक्ताभिसरणाला चालना मिळते. यामुळे नवीन पेशी तयार होऊन त्वचा चमकदार बनते.
सतत पाणी पिणे हे व्यक्तीला वारंवार आजारी पडण्याच्या समस्येपासून देखील वाचवू शकते.
नियमित योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. पाणी प्यायलाने भूक कमी लागते, त्यामुळे आवश्यक तेवढेच अन्न पोटात जाते. सकाळी उपाशीपोटी पाणी प्यायल्याने लघवीसोबत शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.