भारतात शेतकरी पारंपारिक शेतीशिवाय अनेक फळांची लागवड करतात. अॅव्होकाडो हे एक विदेशी फळ आहे. पण अॅव्होकाडो खाण्याचे अनेक फायदे आहेत. अॅव्होकाडो खाल्ल्याने वजन आटोक्यात ठेवण्यास मदत होते. अॅव्होकाडो हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकते. अॅव्होकाडो खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. अॅव्होकाडोमुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. रक्तदाब आणि मधुमेहाचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.