बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हायांचा काही दिवासांपूर्वी एक फोटो व्हायरल झाला होता.



व्हायरल झालेल्या फोटोमुळे सलमान आणि सोनाक्षीनं गुपचूप लग्न केलं आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता.



सलमान आणि तिच्या व्हायरल झालेल्या फोटोवर सोनाक्षीनं प्रतिक्रिया दिली.



व्हायरल झालेल्या फोटोबद्दल सोनाक्षी म्हणाली, 'तुम्ही सर्व वेडे आहात का? एडिट केलेला फोटो तुम्हाला कळत नाही?'



व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सोनाक्षी ही रेड कलरची साडी, गोल्ड ज्वेलरी आणि सिंदूर अशा लूकमध्ये दिसत आहे.



2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या दबंग चित्रपटामधून सोनाक्षीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.



सोनाक्षीसोबतच सलमान खानचं अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि ऐश्वर्या राय या अभिनेंत्रीसोबत देखील नाव जोडण्यात आलं होतं.



सोनाक्षी वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते