तुम्हाला कॅन्सरपासून स्वत:चं संरक्षण करायचं असेल तर, आहारात केळ्याचा समावेश नक्की करा.



केळी आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात. यामध्ये अनेक पोषकतत्वे असतात.



आपल्या शरीराचं अनेक आजारांपासून संरक्षण होतं. बहुतेक लोक शरीर धष्ट-पुष्ठ करण्यासाठी किंवा वजन वाढवण्यासाठी आहारात केळ्याचा समावेश करतात.



केळीचे इतर काही फायदे तुम्हाला माहित नसतील. एका अभ्यासात उघड झालं आहे की, केळ्यामुळे कॅन्सरपासून संरक्षण होऊ शकते. केळी खाल्ल्याने कॅन्सरपासून बचाव होऊ शकतो.



केळ्याच आहारात समावेश केल्याने तुमचं कॅन्सरपासून संरक्षण होण्यास मदत होऊ शकते.



केळ्यामधील रजिस्टेंट स्टार्च (Resistant Starch) यामध्ये परिणामकारक ठरते.



केळ्याशिवाय इतर भरपूर प्रमाणात रजिस्टेंट स्टार्च असलेल्या खाद्यपदार्थांमुळेही तुमचं कॅन्सरपासून संरक्षण होईल.



मेडिकल न्यूज टुडेच्या रिपोर्टनुसार, रजिस्टेंट स्टार्च कार्बोहायड्रेस युक्त असतात.



रेझिस्टन्स स्टार्च हा जटिल पिष्टमय पदार्थाचा एक प्रकार असून हे पचायला जास्त वेळ लागतो.



स्टार्च छोट्या आतड्यांमधून मोठ्या आतड्यापर्यंत जाते आणि तेथे या स्टार्चचं पचन होतं. रजिस्टेंट स्टार्च वनस्पती आधारित अन्नपदार्थांमध्ये आढळतो. यामध्ये केळी, तांदूळ, तृणधान्यं, बीन्स, शिजवलेला किंवा कच्चा पास्ता याचा समावेश आहे.