भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी लैंगिक छळाचा आरोप असलेल्या

भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह

यांच्या निवडीनंतर साक्षी मलिक आणि विनेश फोगटयांनी

कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे.

यानंतर आता बजरंग पुनियाने पद्मश्री वापसीची घोषणा केली आहे.

बजरंग पुनियाने पीएम मोदींना पत्र लिहून बृजभूषण सिंह यांचे वाभाडे काढले आहेत.

पैलवानांच्या प्रदीर्घ आंदोलनानंतर बृजभुषण सिंह यांना अध्यक्षपद सोडावे लागले.

मात्र, ज्या नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे,

तेही ब्रिजभूषणचा राईट हँड असल्याची स्थिती आहे.

त्यामुळे गेल्या 11 महिन्यांपासून सुरू असलेले कुस्तीगीरांचे आंदोलन पूर्णपणे निष्प्रभ ठरले आहे.