आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले. (Photo Credit : facebook./CMOMaharashtra)



विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील, आमदार ॲड. मनीषा कायंदे, रईस शेख, अमोल मिटकरी उपस्थित होते. (Photo Credit : facebook./CMOMaharashtra)



महाराष्ट्राच्या राजकारणातील वादळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंनी राज्याच्या राजकारणाला नवी दिशा दिली. (Photo Credit : facebook./CMOMaharashtra)



बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे या वादळाचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. (Photo Credit : facebook./CMOMaharashtra)



1955 साली बाळासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात एक व्यंगचित्रकार म्हणून केली. (Photo Credit : facebook./CMOMaharashtra)



1989 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी सामना या वृत्तपत्राची स्थापना केली. (Photo Credit : facebook./CMOMaharashtra)



स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती आहे. (Photo Credit : facebook./CMOMaharashtra)



नेताजींनी स्वातंत्र्य चळवळीत मोलाचा वाटा निभावला. (Photo Credit : facebook./CMOMaharashtra)



त्याच्या स्मरणार्थ कृतज्ञता म्हणून हा दिवस दरवर्षी 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा केला जातो. (Photo Credit : facebook./CMOMaharashtra)



नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक, ओडिशा, बंगाल विभागात झाला. (Photo Credit : facebook./CMOMaharashtra)