मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातून निघालेली मनोज जरांगे यांची पायी दिंडी पुण्यात दाखल झाली आहे. (PC : Facebook/Shivraj Mane Photography)
जालना , बीड आणि अहमदनगर असे तीन जिल्ह्यांचा प्रवास करून जरांगे पुणे जिल्ह्यात दाखल झाले आहेत. (PC : Facebook/Shivraj Mane Photography)
तिसऱ्या दिवशी म्हणजेच 22 जानेवारीचा मुक्काम त्यांनी रांजणगाव गणपती येथे केला. (PC : Facebook/Shivraj Mane Photography)
आज सकाळी पुन्हा 10 वाजता जरांगे हे लाखो मराठ्यांसह मुंबईकडे कूच करतील. (PC : Facebook/Shivraj Mane Photography)
दरम्यान, आज दुपारच भोजन भीमा कोरेगाव येथे केले जाणार आहे. (PC : Facebook/Shivraj Mane Photography)
तर, आजचा मुक्काम पुणे जिल्ह्यातील चंदननगर येथे केला जाणार आहे. (PC : Facebook/Shivraj Mane Photography)
विशेष म्हणजे आज आणि उद्याचा प्रवास करून 26 जानेवारीला मनोज जरांगे मुंबईत धडकणार आहे. (PC : Facebook/Shivraj Mane Photography)
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी यापूर्वी आंतरवाली सराटीत आमरण उपोषण केले. (PC : Facebook/Shivraj Mane Photography)
आम्ही गनिमी काव्याने मुंबई गाठणार असल्याचे देखील जरांगे म्हणाले आहे.(PC : Facebook/Shivraj Mane Photography)
त्यामुळे 26 जानेवारीला मुंबईतील गल्ली-गल्लीत मराठे पाहायला मिळतील असा थेट इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला. (PC : Facebook/Shivraj Mane Photography)