उद्योगपती आणि रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानीही आपल्या संपूर्ण कुटुंबासह अयोध्येच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. (Photo : PTI)
मुकेश अंबानी यांनी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला 2.51 कोटी रुपये देण्याची घोषणा केली. (Photo : PTI)
अंबानी कुटुंबाने अभिषेक प्रसंगी मंदिराला भेट दिल्यानंतर ही घोषणा केली. (Photo : PTI)
अयोध्येच्या कार्यक्रमाच्या एक दिवस आधी मुकेश अंबानी यांनी त्यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानालाही सजवलं होतं. (Photo : PTI)
अंबानींचे हे निवासस्थान फुलांनी आणि विद्युत रोषणाईंनी झळाळून उठलं होतं. (Photo : PTI)
मुकेश अंबानी हे त्यांच्या पत्नी नीता अंबानी, मुलगी ईशा आणि जावई आनंद पिरामल, मुले आकाश आणि अनंत, सून श्लोका आणि होणारी सून राधिका मर्चंट यांच्यासह अयोध्येत होते. (Photo : PTI)
मंदिरात जाण्यापूर्वी मुकेश अंबानी म्हणाले होते की, आज प्रभू राम येत आहेत. 22 जानेवारीला संपूर्ण देशात राम दिवाळी असेल. (Photo : PTI)
रिलायन्सच्या अध्यक्षांनी यापूर्वीही अनेक मंदिरांना देणगी दिली आहे. (Photo : PTI)
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीला त्यांनी पाच कोटी रुपयांची देणगी दिली होती. (Photo : PTI)
फेब्रुवारी 2023 मध्ये, त्यांनी आणि त्यांचा मुलगा आकाश यांनी गुजरातमधील सोमनाथ मंदिराला भेट दिली आणि ट्रस्टला 1.51 कोटी रुपये दान केले. (Photo : PTI)