बॉलिवूड अभिनेता अरबाज खान वयाच्या 56 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला.
अर्पिता खानच्या घरी अरबाजचा लग्नसोहळा पार पडला आहे.
गर्लफ्रेंड शुरा खानसोबत त्याने दुसरं लग्न केलं आहे.
शुरा ही मेकअप आर्टिस्ट आहे.
अरबाजच्या लेकानेही या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.
अरबाज खान आणि शुरा खान यांचा लग्नसोहळा 24 डिसेंबर 2023 रोजी सलमानची बहिण अर्पिता खानच्या घरी पार पडला.
या लग्नसोहळ्याला अनेक नामांकित सेलिब्रिटींनी हजेरी लावली
अरबाज खाननेही शूरासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
या फोटोंमध्ये अरबाज आणि शूरा यांचा रोमँटिक अंदाज दिसला.
हे फोटो शेअर करताना अरबाज खानने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या प्रिय व्यक्तींच्या उपस्थितीत, मी आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात करत आहे. तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छांची गरज आहे.