'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 'अवतार 2' हा सिनेमा 16 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दहा दिवसांत या सिनेमांने कोट्यवधींची कमाई केली आहे. 'अवतार 2' हा सिनेमा कमाईच्या बाबतीत आघाडीवर आहे. रिलीजच्या पहिल्या वीकेंडला 'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाने 120 कोटींची कमाई केली होती. 'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाने आतापर्यंत 252 कोटींचा गल्ला जमवला आहे. 'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. लवकरच हा सिनेमा 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो. रिलीजआधीच 'अवतार 2' या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. 'अवतार 2' या सिनेमाची निर्मिती 250 मिलियन डॉलर्स म्हणजेच 2000 कोटींमध्ये करण्यात आली आहे.