मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि रणवीर सिंह यांची मैत्री सर्वांवाच ठाऊक आहे. मराठमोळा सिद्धु आता बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहसोबत 'सर्कस' या सिनेमात झळकत आहे. रणवीरने आपल्या सिद्धूचे तोंडभरून कौतुक केले आहे. रणवीर सिंह म्हणाला,सिद्धू एक खूप चांगला, स्वच्छ मनाचा आणि प्रेमळ असा माणूस आहे. रणवीर पुढे म्हणाला,सिद्धार्थ सुपरस्टार आहे. सिध्दार्थने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून रणवीरचे आभार मानले आहेत. रणवीरने याआधीदेखील सिध्दार्थच्या 'बालभारती' सिनेमादरम्यान त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. आपला लाडका सिद्धू अर्थात मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव लवकरच साऊथच्या दिग्गज कलाकारांसोबत झळकणार आहे. मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने अनेक नाटकांत, सिनेमांत, मालिकांमध्ये काम केलं आहे. 'आपला सिध्दू' या सिध्दार्थ जाधवच्या हॅशटॅगची क्रेझ सिध्दार्थच्या चाहत्यांमध्ये दिसून येते.