सनरूफ आणि पॅनोरामिक सनरूफमध्ये फरक काय?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

आता हॅचबॅक कार्सपासून ते मिनी एसयूव्हींपर्यंत, ग्राहकांसाठी हे फिचर आवश्यक झाले आहे.

Image Source: pexels

तुम्ही अनेकदा सनरूफ आणि पॅनोरामिक सनरूफसारखे शब्द ऐकले असतील. या सनरूफमध्ये नेमका काय फरक असतो? चला तर जाणून घेऊया.

Image Source: pexels

गाडीच्या छतावर बसवलेले लहान पॅनल सनरुफ असते, तर संपूर्ण छतावर पसरलेले मोठे आणि रुंद ग्लास पॅनलला पॅनोरामिक सनरुफ म्हणतात.

Image Source: pexels

सनरूफ केवळ ड्रायव्हर आणि समोरच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीसाठी असते, तर पॅनोरामिक सनरूफ संपूर्ण केबिनमध्ये असते.

Image Source: pexels

पॅनोरमिक सनरूफमध्ये मागे बसलेले लोक देखील पूर्ण मोकळेपणा अनुभवतात, तर सनरूफमध्ये हे शक्य नसते.

Image Source: pexels

सनरूफ कारला साधारण रूप देते, तर पॅनोरामिक सनरूफ कारला अत्यंत प्रीमियम रूप देते.

Image Source: pexels

पॅनोरामिक सनरुफमुळे उन्हाळ्यात केबिन लवकर गरम होऊ शकते, तर सामान्य सनरुफच्या तुलनेत त्यातून अधिक सूर्यप्रकाश आत येतो.

Image Source: pexels

पॅनोरामिक सनरुफ प्रवाशांना कन्व्हर्टेबल कारसारखा विस्तृत मोकळा अनुभव देतो, जो सनरुफमध्ये शक्य नाही.

Image Source: pexels

जर तुम्हाला परवडणाऱ्या दरात हवा खेळती आणि थोडे मोकळे वातावरण हवे असेल, तर सनरूफ निवडा.

Image Source: pexels

जर तुम्हाला आलिशान, उत्कृष्ट दृश्य आणि मोकळे केबिन हवे असतील, तर पॅनोरामिक सनरूफ हा उत्तम पर्याय आहे.

Image Source: pexels