प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या इमारतीला तिरंगा रोषणाई करण्यात आली. या खास रोषणाईने पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले. अनेक पर्यटक, प्रवाशांनी या इमारतीसोबत सेल्फीदेखील घेतले. भारतीय रेल्वेच्या प्रवासाची साक्षीदार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारतीला प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तिरंगा रोषणाई करण्यात आली. या वास्तूचे बांधकाम 1878 मध्ये सुरू झाले आणि 1888 मध्ये बांधून तयार झाली होती. फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन आणि अॅक्सल हेग हे या इमारतीचे वास्तुविशारद होते. या इमारतीला अनेक महत्त्वाच्या दिनानिमित्ताने त्याला साजेशी अशी रोषणाई करण्यात येते. सीएसएमटी या देखण्या वास्तूचा समावेश संयुक्त राष्ट्राच्या जागतिक वारसा स्थळात करण्यात आला आहे.