येत्या 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे.

त्यामुळे अनेकांच्या घरी सजावटीची लगबग पाहायला मिळत आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pixel

आपल्याकडे सर्वच देवतांना विशिष्ट फुलं वाहण्याची प्रथा आहे .

जसे विठोबाला तुळस, शंकराला बेल, गणपतीला दूर्वा आणि जास्वंदाची फुले ...

Image Source: pixel

गणांचा अधिपती म्हणजेच गणपती.

हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वच कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा केली जाते.

Image Source: pixel

गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र, जास्वंदीसारखे लाल फूल, रक्तचंदन यांसारख्या लाल वस्तू वापरणे महत्त्वाचे मानले जाते.

याचे कारण म्हणजे गणपतीचा वर्ण शेंदरी / लाल आहे.

Image Source: pixel

गणपती बाप्पाला जास्वंदीच फूल आणि दूर्वा का वाहतात ?

असा प्रश्न अनेकदा विचारला जातो.

Image Source: pixel

ही फुले अर्पण केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतात ,

आणि त्यांच्या भक्तांचे सर्व त्रास दूर करतात.

Image Source: pixel

पूजेत वापरलेल्या वस्तूंच्या लाल रंगामुळे गणेशाचे तत्त्व मूर्तीकडे जास्त प्रमाणात आकृष्ट होते.

जास्वंदाची लाल आणि पिवळी फुले गणेशाला खूप प्रिय आहेत.

Image Source: pixel

दूर्वांमध्ये श्री गणेशाचे तत्त्व जास्तीत जास्त प्रमाणात आकृष्ट करून घेण्याची क्षमता असते.

दुर्वांना ३, ५, ७ अशा विषम संख्येच्या पात्या असाव्या.

Image Source: unplash

प्रत्येक देवतेच्या काही संख्या आहेत जसे १२ रवि, ११ रुद्र म्हणजेच शंकर त्याप्रमाणे गणेशाची संख्या २१ आहे .

म्हणून गणेशाला २१ मोदकांचा नैवेद्य, २१ दुर्वांची जुडी किंवा २१ पत्री वाहिल्या जातात.

Image Source: pixel

आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत.

महणून लगबग पाहायला मिळत आहे.

Image Source: unplash

टीप :

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.