यांना कुठल्याही गोष्टीचा राग एकदम पटकन येतो.
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो.
त्यांच्या नाकाच्या शेंड्यावर नेहमी राग असतो.
मंगळाच्या वर्चस्वामुळे 9 मूलांकाचे लोक खूप तापट असतात.
एवढीशी गोष्ट झाली तरी ते लगेच हायपर होतात.
एखाद्या माणसाचं बोलणं, वागणं पटलं नाही तर ते त्याच्यावर दात खावून येतात.
त्यांना इतका राग येतो की एका वेळेनंतर ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.
ते कोणताही धोका पत्करण्यास तयार असतात.
कोणतीही जोखीम घ्यायला ते अजिबात घाबरत नाहीत.
त्यांच्या आयुष्यात कोणतीही समस्या आली तरी ते त्या समस्येला अगदी धैर्याने सामोरे जातात.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)