7 सप्टेंबर 2024 रोजी गणेशाची स्थापना होणार आहे.
गणेश ही विद्येची देवता, संकटांचं निवारण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे.
एखाद्या महत्कार्याच्या आरंभी ' श्री गणेशाय नम: ' म्हणून गणेशाची स्तुती व आराधना करण्याची प्रथा आहे.
बाप्पाही प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात.
त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात काही वस्तूंची खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं.
गणेशोत्सवा दरम्यान घरी एकमुखी नारळ आणावा. पूजेमध्ये एकमुखी नारळ तुम्ही अर्पण करु शकता आणि नंतर पूजास्थानी किंवा तिजोरीत ठेवा.
गणेशोत्सवाच्या दरम्यान तुम्ही छोटी गणेशाची मूर्ती किंवा गणपतीचा फोटो घरात आणू शकता. तसेच, घराच्या उत्तर दिशेला ही मूर्ती ठेवा. यामुळे घरात नकारात्मक शक्तींचा वावर होणार नाही.
गणेशोत्सवाच्या विशेष प्रसंगी शंख घरी आणल्याने आर्थिक प्रगती होते आणि वास्तुदोषही दूर होतात. गणपतीची पूजा आणि आरती झाल्यानंतर दररोज शंख वाजवावा.
भगवान कुबेर हे संपत्तीचे देवता मानले जातात. कुबेर देवाची मूर्ती घरात ठेवल्याने गणेश आणि देवी लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात आणि घरातील दारिद्र्यही दूर होते.
घरात बासरी ठेवणे खूप शुभ मानले जाते. तुम्ही चांदीची बासरी देखील ठेवू शकता. यामुळे देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)