नव्या वर्षासाठी तुम्हीही काही ना काही संकल्प केले असतील.
पण तुम्हाला माहिती आहे का? अंकज्योतिष शास्त्रानुसार, तुम्ही नव्या वर्षातील काही गोष्टींचा अंदाज बांधू शकता.
2025 मध्ये अंकज्योतिषानुसार, कुल योग 9 असेल.
यावर्षाती सर्व अंकांचा योग (2+0+2+5=9) 9 होतोय.
9 मंगळाचा अंक मानला गेला आहे.
त्यामुळे, येत्या नव्या वर्षात तुमच्यावर मुख्यतः 9, 1, 8 आणि 5 अंकांचा विशेष प्रभाव राहील.
म्हणून 2025 वर्ष 9 मूलांक असणाऱ्यांसाठी लकी ठरेल.
9 मूलांक असलेल्या व्यक्तींची सर्व अपूर्ण कामं पूर्ण होतील.
या वर्षात तुमच्यावर नव्या आणि मोठ्या जबाबदाऱ्या पडू शकतात.
त्यामुळे 9 मूलांक असलेल्यांना मोठ्या धैर्यानं या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील.
9 मूलांक असलेल्यांनी नव्या वर्षात दर मंगळवारी हनुमानाला जाऊन शेंदूर चढवणं शुभं राहील, असं सांगितलं जात आहे.
एकंदरीतच 9 मूलांक असलेल्यांसाठी नवं वर्ष सुख-समृद्धीचं जाईल, यात शंका नाही.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.