कचरा टाकण्यासाठी वापरली जाणारी डस्टबिन ही प्रत्येक घरात आढळणारी महत्त्वाची वस्तू आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: pexels

जर तुम्ही घरात चुकीच्या ठिकाणी डस्टबिन ठेवली तर देवी लक्ष्मी नाराज होण्याची शक्यता असते. यामुळे तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो.

Image Source: pexels

वास्तू शास्त्रात डस्टबिनशी संबंधित काही महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत.

Image Source: pexels

जर या नियमांचं पालन केलं नाही तर धनहानी देखील होण्याची शक्यता असते.

Image Source: pexels

वास्तू शास्त्रानुसार, घरातील डस्टबिनला नेहमी घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला ठेवणं योग्य आहे.

Image Source: pexels

घराची उत्तर-पश्चिम दिशा विसर्जन करण्यासाठी चांगली मानली जाते. त्यामुळे तुम्ही उत्तर-पश्चिम दिशेला डस्टबिन ठेवू शकता.

Image Source: pexels

वास्तू शास्त्रानुसार, कधीही घरातील डस्टबिनला उत्तर पूर्व दिशेला ठेवू नका.

Image Source: pexels

घरातील कचऱ्याला कधीही घराच्या बाहेर ठेवू नका. विशेषत:घराच्या मुख्य द्वाराजवळ कधीही डस्टबिन ठेवण्याची चूक करु नका.

Image Source: pexels

तसेच, किचन, पूजा घर आणि बेडरुममध्ये देखील डस्टबिन ठेवू नका.

Image Source: pexels

घरातील तिजोरीजवळ, तुळशीच्या रोपाजवळ कधीच डस्टबिन ठेवण्याची चूक करु नका. यामुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते.

Image Source: pexels

टीप

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)