मेष रास (Aries)

तुमचं आरोग्य निरोगी राहावं यासाठी पौष्टिक आहार घ्या. तरच तुमची रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहील.

वृषभ रास (Taurus)

आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तुम्हाला दिर्घकाळापासून सुरु असलेली दातदुखीची समस्या पुन्हा जाणवू शकते. अशा वेळी लगेच तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

मिथुन रास (Gemini)

आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास शरीराला थोडा वेळ विश्रांती द्या. तुम्हाला पाण्याची अॅलर्जी सुद्धा होऊ शकते.

कर्क रास (Cancer)

तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे. पण म्हणून तुम्ही तुमच्या जुन्या दिर्घकाली आजाराकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह रास (Leo)

तुमची तब्येत अगदी ठणठणीत असणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणतीही प्रकारची चिंता करू नका. निर्धास्त राहा.

कन्या रास (Virgo)

दम्याचा त्रास असलेल्या लोकांनी आज जरा जास्त काळजी घ्यावी. पथ्यपाणी सांभाळा.

तूळ रास (Libra)

अगदी थोडीशी समस्या असल्यास, डॉक्टरकडे जा. सांधेदुखीच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल.

वृश्चिक रास (Scorpio)

आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. तुम्हाला जास्त मानसिक ताण घेण्याची गरज नाही.

धनु रास (Sagittarius)

वजन कमी करण्यासाठी जंक फूड सोडून द्या आणि निरोगी खाण्यावर लक्ष केंद्रित करा.

मकर रास (Capricorn)

तुमची दिनचर्या वेळोवेळी विस्कळीत होत असेल तर तुम्ही ती सुधरण्याचा प्रयत्न करा.

कुंभ (Aquarius)

तुमची तब्येत काही काळापासून बरी होत नसेल तर आता त्यात सुधारणा होऊ शकते.

मीन (Pisces)

तब्येतीत सुधारणा तुमच्यात एक आत्मविश्वास आणेल.

टीप

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)