गणरायाची पुजा करताना, किंवा एखाद्या चांगल्या कामाला सुरुवात करताना गणेशाची आठवण काढून, ‘गणपती बाप्पा मोरया’ असं म्हणत त्याच्या नावाचा जयघोष केला जातो.

गणेशोत्सवात, स्थापनेपासून विसर्जनापर्यंत हा जयघोष केला जातो.

पण तुम्हाला माहीत आहे का की, 'गणपती बाप्पा मोरया' मध्ये 'मोरया' शब्दाचा अर्थ काय आहे?

'मोरया' या शब्दाचा अर्थ शास्त्र किंवा पुराणातून घेतलेला नाही. किंबहुना, हे बाप्पाच्या भक्तांशी संबंधित आहे.

मोरया याचा अर्थ संत मोरया गोसावी यांच्याशी जोडलेला आहे जे बाप्पाचे परम भक्त होते.

संत मोरया गोसावी यांनी आपलं संपूर्ण जीवन बाप्पाच्या सेवेसाठी अर्पण केलं.

शेवटी संत मोरया गोसावी यांनी चिंचवड (पुणे) येथे समाधी घेतली.

त्यानंतर बाप्पाच्या नावाचा जयघोष करताना 'मोरया' शब्द वापरायला सुरुवात झाली.

जेव्हा आपण गणपती बाप्पा मोरया म्हणतो, त्यावेळी त्याचा अर्थ असा होतो की,

हे गणपती बाप्पा, संत मोरया गोसावी यांच्यासारखेच आमुच्यावरही तुमची कृपादृष्टी कायम राहू द्या...

टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.