हिंदू धर्मात पितृपक्षादरम्यान मृत पूर्वजांचे श्राद्ध करण्याची परंपरा आहे.



पण जर कोणी पितृपक्षात श्राद्ध केले नाही तर काय होईल असा अनेकदा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.



पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी त्यांच्या वंशातील व्यक्तींनी श्राद्ध करणं आवश्यक आहे.



अशी मान्यता आहे की पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते.



गरुड पुराणानुसार, श्राद्ध न केल्यास पितृदोष लागू शकतो.



पितृदोषामुळे कुटुंबातील सुख-शांती नाहीशी होते.



श्राद्ध न केल्यास व्यापार, संतती, धन या संबंधित समस्या येतात.



म्हणून पितृ पंधरवड्यात पूर्वजांचे श्राद्ध करणे महत्त्वाचे आहे.