केस गळण्याचा त्रास फक्त हार्मोनल बदलांमुळेच नाही तर ग्रहांच्या अशुभतेमुळे देखील होऊ शकते. केस गळण्याच्या मागे नेमका कोणता ग्रह कारणीभूत असतो आणि त्यावर उपाय काय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

Published by: जगदीश ढोले
Image Source: meta ai

ज्योतिष शास्त्रानुसार, शरीराच्या प्रत्येक अंगाचा संबंधकोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे.

Image Source: meta ai

या दरम्यान आपण अनेक घरगुती उपाय किंवा औषधोपचार केले तरी त्याचा फरक नाही पडत. अशातच जर तुमची केसगळती थांबत नसेल तर त्याचा संबंध कोणत्या ग्रहाशी आहे ते जाणून घेऊयात.

Image Source: meta ai

आयुष्यात अनेक अडचणी, मानसिक तणाव तसेच, अपयश येतं. अशा वेळी केसांची अवस्था देखील बिघडू लागते.

Image Source: abp majha

अशा वेळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की, इतके प्रयत्न करुनही केसगळती कमी का होत नाही. तर, बुध ग्रहाच्या ऊर्जेच्या असंतुलनामुळे हे होतं.

Image Source: abp majha

जर तुमच्या कुंडलीत राहू ग्रह धनु किंवा वृश्चिक स्थानावर विराजमान असेल तर सूर्यावर याची दृष्टी पडते. तेव्हा केसगळती कमीच होत नाही. अशा वेळी राहू ग्रहाला मजबूत करण्यासाठी केस झाकण्यास सांगितलं जातं.

Image Source: abp majha

कुंडलीत आठव्या किंवा द्वादश चरणात शनीचं स्थित असणंसुद्धा केसगळतीचं कारण होऊ शकतं. अशा वेळी शनीशी संबंधित वस्तूंचं दान करा.

Image Source: abp majha

त्याचबरोबर, कडुलिंबाचं तेल केसांना लावावं यामुळे शनीची प्रकृती अनुकूल राहते

Image Source: abp majha

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pinterest