पिंपळाच्या झाडाचं पुराणांमध्ये मोठं महत्त्व सांगण्यात आलं आहे. पिंपळाचं झाड पूजनीय वृक्ष मानलं जातं. यावर त्रिदेवांचा वास असल्याचंही सांगितलं जातं. राहतात.
पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केल्यानं केवळ देवच नाहीतर, ग्रह आणि पितरांचाही आशीर्वाद लाभतो.
पिंपळाच्या झाडाला गोड पाणी अर्पण करणे अत्यंत शुभ मानलं जातं.
असं मानलं जातं की, यामुळे मानसिक शांती आणि आर्थिक प्रगती होते. आणि त्याचबरोबर शनि दोष दूर होतात. पितर तृप्त राहतात.
एका तांब्याच्या भांड्यात पाण्यासोबत गूळ किंवा साखर मिसळून, ते पूर्व दिशेकडे तोंड करून पिंपळाच्या झाडाला अर्पण करा.
रविवार पिंपळाला पाणी अर्पण करू नये, यामुळे दारिद्र्य येतं.
रोग, मानसिक व्याधींपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि दीर्घायुषासाठी पिंपळाच्या झाडाला रोज प्रदक्षिणा घालणं शुभ असतं.
राहू आणि केतूचा प्रभाव जर पत्रिकेत (कुंडलीत) चूक असेल तर, ते पिंपळाचं झाड लावल्यानं त्या ग्रहांना शांती मिळते.