गुरुवारचा दिवस हा भगवान विष्णूला समर्पित आहे.

Published by: जयदीप मेढे

भगवान विष्णूला संतुष्ट करण्यासाठी गुरुवारच्या दिवशी विष्णु सहस्रनामाचा जप करावा.

मान्यतेनुसार, विष्णु सहस्रनामाचा जप केल्याने सुख, शांती, संपत्ती, यश, आरोग्य लाभते.

विष्णु सहस्रनामाचा जप केल्याने शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून मुक्ती मिळते.

विष्णु सहस्रनामामध्ये भगवान विष्णूंच्या सर्व नावांचा उल्लेख आहे.

विष्णू सहस्त्रनामाचे पठण करण्यापूर्वी, विष्णूला गूळ किंवा पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी.

विष्णू सहस्त्रनामाचा पाठ हा संस्कृत भाषेमध्ये आहे म्हणून शब्दोच्चार शुद्ध असावा.

करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी विष्णू चालिसाचे पठण करणं श्रेष्ठ मानलं जातं.

यामुळे कुंडलीतील गुरू ग्रह मजबूत होतो अशी मान्यता आहे.

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.