आयुष्यात पैसा, समृद्धी आणि चांगल्या संधी हव्या असतील तर 'या' चुका टाळा
ज्योतिषशास्त्रानुसार, चांदीचा रंग पांढरा आहे. आणि पांढरा रंग हा चंद्राचं प्रतीक मानला जातो.
घरात चांदी ठेवण्यासाठी योग्य स्थान चंद्राची दिशा मानली जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र पश्चिमेला उगवतो आणि पूर्वेला मावळतो.
कोणत्याही ग्रहाशी कोणत्याही धातूचा संबंध असला तरी त्या धातूला ग्रहाच्या उदयाच्या ठिकाणी ठेवणं शुभदायक मानलं जातं.
अशा वेळी घरात चांदीच्या वस्तू असतील किंवा दागिने असतील तर त्या घराच्या पश्चिम दिशेलाच ठेवाव्यात असं वास्तूशास्त्रात म्हटलंय.
चांदीच्या वस्तू नेहमी लाल कपड्यात गुंडाळून ठेवाव्यात. यामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते.
चांदीच्या सजावटीच्या वस्तू घरात ठेवल्याने धन-संपत्तीतही वाढ होण्यास मदत होते.
घरातील वास्तूदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तर घरात चांदीचा खिळा नक्की ठेवावा.
व्यावसायिकांनी देखील चांदीची वस्तू योग्य दिशेला ठेवल्यास व्यवसायात तुमची प्रगती होऊ शकते असं म्हणतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)