वास्तूनुसार घरातील शूज आणि चपला यांचीही योग्य दिशा सांगितली आहे.
घरात कुठेही बूट आणि चपला ठेवल्यास देवी लक्ष्मीचा कोप होतो.
शूज आणि चपला कधीही उलटे ठेवू नयेत. असे म्हणतात की यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि कुटुंबातील सुख-शांती भंग पावते.
त्यामुळे घरी आलेली लक्ष्मी दारातून परतते. पैसा येण्याचा मार्ग थांबू शकतो.
वास्तूनुसार शूज आणि चपला उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवू नयेत ही देवी लक्ष्मीची दिशा आहे.
उत्तर किंवा पूर्व दिशेला चपला ठेवल्याने लक्ष्मीचा वास घरात राहत नाही.
वास्तूनुसार घरात शूज आणि चपला नेहमी कपाटात ठेवावीत.
कपाटाची दिशा दक्षिण किंवा पश्चिम ठेवा. शूज आणि चपला ठेवण्यासाठी ही दिशा योग्य मानली जाते.
शूज आणि चपला कधीही घराच्या बेडरूममध्ये ठेवू नयेत. त्यामुळे वैवाहिक जीवनात तणाव वाढतो. पती-पत्नीच्या नातेसंबंधावर विपरीत परिणाम होतो.
शूज आणि चपला स्वयंपाकघरात ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे गरिबी येते.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)