दूध शरीराला पोषण देणे आणि उर्जावान बनवण्याचं काम करतं. मात्र दुधाचं उतू जाणं शुभ मानलं जात नाही. जर वारंवार दूध उतू जात असेल तर, लवकरच तुम्हाला धनहानी, गरीबी, किंवा आर्थिक नुकसानीला सामोरं जाण्याची शक्यता आहे. अचानक दूध उतू गेल्याने घरात तणावाचे वातावरण निर्माण होते. ज्योतिष शास्त्रानुसार, बुधवारच्या दिवशी दूध जळणं, उतू जाणं फार अशुभ मानलं जातं. बुधवारच्या दिवशी दूध उतू गेल्यास तुमच्या नोकरी-व्यवसायात प्रचंड नुकसान होऊ शकते. बुधवारच्या दिवशी दूध उतू जात असल्यास पैसा येण्याच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात. उकळते दूध उतू जाणे हे काही रोग येण्याचे संकेत दर्शवते. या दिवशी दूध उतू गेल्यास घरात सुख-समृद्धी राहत नाही. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)