अंकशास्त्रानुसार, मूलांक 4 हा अनेक अर्थांनी खास आहे. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13 आणि 22 तारखेला झाला आहे अशा लोकांचा मूलांक 4 असतो. या जन्मतारखेच्या लोकांवर सूर्यदेवाची विशेष कृपा असते. या जन्मतारखेचे लोक लहानपणापासूनच मेहनती असतात. या जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांचं भविष्य फार उज्ज्वल असतं. लहानपणापासूनच यांच्यात स्वार्थीभाव असतो. इतरांकडून आपलं काम काढून घेणं यांना पटकन जमतं. या जन्मतारखेच्या लोकांकडे अमाप धनसंपत्ती असल्या कारणाने हे लोक स्वभावाने फार घमंडी असतात. लोकांना भेटणं, त्यांच्याशी संवाद साधणं किंवा कोणत्या प्रकारची मदत करणं यांना अजिबात आवडत नाही. सामाजिक आणि धार्मिक कार्यात यांची फार आवड असते. या जन्मतारखेचे लोक धनसंपत्तीने समृद्ध असतात. देवी लक्ष्मीची यांच्यावर सतत कृपा असते.