आज सुख मानून घ्यावे लागेल, आलेली संधी आणि त्यापासून मिळणारा फायदा हा थोडा मनाविरुद्ध असू शकतो
आज नोकरी व्यवसायात अडचणी आल्या, तरी त्या दूर होतील, हाताखालच्या लोकांचे सहकार्य मिळण्यासाठी त्यांना मसका लावाल.
आज आर्थिक मान चांगले राहील, जुनी येणी वसूल होतील रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी वेळेवर औषधोपचार घ्यावेत
आज काम करताना आत्मविश्वासाचा अभाव आणि मानसिक अस्वास्थ्य जाणवेल
आज मनाच्या शांतीसाठी ओंकार आणि प्राणायाम याचा उपयोग जरूर करा, महिलांना त्यांच्या मताशी तडजोड करणे भाग पडेल
आज जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आनंदी राहील, भाग्याची साथ मिळेल
आज संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी, संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल
आज कोणत्याही नवीन योजना अमलात आणायची घाई करू नका, नोकरी धंद्याच्या ठिकाणी अचानक काम मिळणे अथवा जाणे दोन्ही शक्यता आहेत
आज भावंडांशी थोडे मतभेद संभवतात, लांबच्या प्रवासाचे योग येतील
आज केलेले प्रवास फायदेशीर ठरतील, महिलांनी आपल्या दृष्टिकोन बदलायला हवा
आज प्रतिकूल परिस्थितीतूनही तुमच्या पराक्रमाला ऊर्जा देणारा दिवस आहे, पुढील महत्त्वाच्या कामाचे नियोजन करा
आज नोकरी धंद्यात बरोबरचे लोक पुढे जात आहेत, याचा अनुभव आल्यामुळे चिडचिड होऊ शकते
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.