सत्ता गाजवून मान मिळवण्याच्या मागे लागाल, कामाचा उरक चांगला राहील
आज लोकांचा विरोध सहन करावा लागेल, नको ती कामे मागे लागून कष्टाचे डोंगर उपसावे लागतील
कुटुंबातील लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल, वैवाहिक सौख्य मिळेल
थोडा आळशीपणा आणि सुस्तपणा जाणवेल, महिला जरा जास्तच काटकसरी बनतील
विवाह उत्सुक तरुण-तरुणींचे विवाह जमतील, ज्येष्ठांनी तब्येत सांभाळावी
अपचनाचा विकार टाळण्यासाठी खाण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल
संधिवातासारखे विकार असणाऱ्यांनी पथ्य पाणी सांभाळावे
परदेशागमनाच्या संधी मिळतील, विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल
डोकं शांत ठेवलात, तर घरात सर्वांचा मूड सांभाळला जाईल
पत्नीकडून आर्थिक फायदा संभवतो, महिलांचा खरेदी करण्याचा मूड राहील.
आज कामात धडाडी दाखवाल, तुमच्यातील साहसी वृत्तीला आज खत पाणी मिळणार आहे.
नको त्या गोष्टीत हट्टीपणा कराल, दुसऱ्यावर व्यवस्थित हुकूमत गाजवाल
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.