वैदिक पंचांगानुसार, आज 18 जून 2025 सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: ABP MAJHA

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांनो आज घरामध्ये धार्मिक कार्यामध्ये आनंदाने सहभागी व्हाल, त्यासाठी पडलेल्या कष्टाचे काही वाटणार नाही.

Image Source: ABP MAJHA

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांनो आज फिरतीची नोकरी असणाऱ्यांना ती मानवेल, महत्वाचे निर्णय घेताना गंभीर निश्चय धोरणी बनाल.

Image Source: ABP MAJHA

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांनो आज तरुण वर्ग प्रेम प्रकरणांमध्ये अडकेल, कोणत्याही कागदपत्र पत्रांमध्ये काही अडचणी येत असतील, तर स्त्रियांच्या मध्यस्थीने कामे मार्गी लागतील.

Image Source: ABP MAJHA

कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांनो आर्थिक घडी व्यवस्थित बसेल, जोडीदाराची महत्त्वाची कामे होतील.

Image Source: ABP MAJHA

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांनो आज ज्यांना मधुमेहाचा त्रास असेल, त्यांनी पथ्य पाणी पाळणे आवश्यक, औषध पाणी आहार विहार व्यवस्थित ठेवायला हवा.

Image Source: ABP MAJHA

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांनो आज संधी आहे ती ओळखा आणि कामाला लागा.

Image Source: ABP MAJHA

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांनो आज महिलांना कुटुंबात तारेवरची कसरत करावी लागेल, विवाह करायचा आहे त्यांचे विवाह जमतील.

Image Source: ABP MAJHA

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज आपल्यासाठी योग्य जोडीदार निवडण्यात यशस्वी व्हाल, घरामध्ये चैनीच्या वस्तूंची खरेदी केली जाईल.

Image Source: ABP MAJHA

धनु रास (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांनो आज आर्थिक घडी चांगली बसल्यामुळे खुश राहाल, घरामधील आनंदी वातावरण तुम्हाला मन स्वास्थ्य देईल.

Image Source: ABP MAJHA

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांनो आज थोडा तापटपणा बाजूलाच ठेवल्यास सर्व गोष्टी सुरळीत होतील, अस्थिर आणि चंचल मनोवृत्तीमुळे कोणतेही निर्णय घेण्यासाठी दुसऱ्यांची मदत घ्यावी लागेल.

Image Source: ABP MAJHA

कुंभ रास (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांनो आज कोणत्याही समस्येपेक्षा आपलं जीवन खूप महत्त्वाचे असते, हे लक्षात ठेवून तुमच्यातील चांगल्या गुणांचा आढावा घेतल्यास सुखावह होईल.

Image Source: ABP MAJHA

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांनो आज महिला जे ठरवतील, ते पार पाडतील, घरामध्ये थोडे संघर्षात्मक वातावरण राहील.

Image Source: ABP MAJHA

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP MAJHA