आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील. थोड्याशा कारणावरून मानसिक स्वास्थ्य बिघडू न देण्याची काळजी घ्या.
आर्थिक प्रश्न थोडे भेडसावतील, परंतु कर्जावर रक्कम मिळू शकते.
वाहने जपून चालवा. घरात आणि घराबाहेर संघर्ष टाळण्याची प्रवृत्ती ठेवावी लागेल.
भांडणाचा आवेश ठेवलात तर गोष्टी अंगलट येण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घ्यावं लागेल.
भावंडांशी मतभेद संभवतात. व्यवसाय-धंद्यात हाती घ्याल ते तडीस न्याल.
आज तुमची चिकित्सक आणि संशोधक वृत्ती कामाच्या बाबतीत उपयोगी पडेल.
बरेच दिवसांपासून नोकरी धंद्यामध्ये येणाऱ्या अडचणींना तोंड दिले तर, आज त्यातून सुटका मिळेल.
घरामध्ये खूपच कमी वेळ द्याल, त्यावरून वैवाहिक जीवनात थोडे वादाचे प्रसंग उद्भवतील.
कोर्ट कचेरीमध्ये समोरचा प्रतिवादी थोडा कमी पडण्याची शक्यता असल्यामुळे बऱ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील.
सर्व बाबतीत मनासारखे लाभ झाल्यामुळे मानसिक स्थिती चांगली राहील. कलाकारांच्या उत्तम कलाकृतींना रसिकांची दाद मिळेल.
नेत्रविकाराच्या दृष्टीने डॉक्टरी सल्ला घेणे क्रमप्राप्त ठरेल. महिला जरा जास्त धार्मिक बनतील.
टेलरिंग व्यवसाय संबंधी निगडीत असणाऱ्यांना भरपूर काम मिळेल. मित्रपरिवाराशी मोठ्या प्रमाणात संपर्क येतील.