विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या दृष्टीने शिक्षण घेण्यासाठी वेगळ्या वाटा शोधाव्या लागतील
महिलांना घरातील वृद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल, बरेच दिवसांपासून घरामध्ये चर्चिला जाणारा एखादा प्रश्न सामोपचराने सुटेल
घरामध्ये उंची वस्तूंची खरेदी होईल, कुटुंबीयांच्या आग्रहाखातर कर्मणुकीच्या कार्यक्रमांचा आस्वादही घ्याल
घरातील एखाद्या अहंकारी व्यक्तीच्या सहवासामुळे मानसिक स्वास्थ बिघडेल
नोकरी व्यवसायामध्ये अचानक बदल संभवतात, त्या बदलाशी जमवून घेणे थोडे अवघड जाईल
प्रकृती स्वास्थ्य सांभाळावे, ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे, त्यांनी पथ्य सांभाळावे
पाय दुखण्यासारख्या किरकोळ गोष्टींचाही विचार आवश्यक करा, धंद्यामध्ये भरपूर स्पर्धा असली तरी सर्वांना पुरून उराल
महिलांना घरचे आणि बाहेरचे सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल
अति भावनेच्या आहारी जाऊन, एखाद्या वेळी चुकीची पावलेली तुमच्याकडून उचलली जाऊ शकतात.
सत्य परिस्थितीचा विचार करून मार्ग आखा, विद्यार्थ्यांना अभ्यास सोडून दुसरेच काहीतरी करावेसे वाटेल.
नोकरी व्यवसायामध्ये कामात बदल होऊ शकतो, जी कामे ठरवाल ती कामे लवकर होण्यासाठी वेगळा पर्याय निवडाल
महत्त्वाची बोलणी आज करू नये, आज लहान मुलं प्रचंड लहरी आणि हेकट बनतील.