अति संवेदनशीलतेमुळे निराश होण्याचे योग येतील एखाद्याबद्दल खूप अनुकंपा वाटेल आणि त्यांना मदतही कराल
जवळच्या नात्यांमधून अपेक्षाभंगाचे दुःख अनुभवाल, कोठेही अंधविश्वास ठेवून काम करू नका
एखाद्या आव्हान पेलण्याचे मनोरत काम कराल, परंतु आपल्या जवळच्या सामर्थ्याचा अंदाज घ्या नाहीतर निराशा पदरात पडेल
वैवाहिक जीवनात काही त्रास संभवतील, महिला थोड्या विसरभोळ्या बनतील
निराश झालेल्या मनाची विकल अवस्था विचारानेच जागेवर येणार आहे, हे आज लक्षात ठेवा.
थोडेसे लहरी आणि विक्षिप्त बनाल कोणत्याही कामाचा ताण जास्त घेऊ नका.
अति स्पष्ट आणि परखड बोलण्याने सहवासातील जवळच्या लोकांची मने दुखावली जातील
नोकरीत वरिष्ठांशी जमणार नाही, कामांमध्ये सतत नाविन्य शोधण्याकडे आणि बदलण्याकडे कल राहील.
संपत्ती स्थितीमध्ये सतत चढ-उतार होऊ शकतात, मुलांच्या तऱ्हेवाईक वागण्यामुळे थोडे वैतागून जाल
घरामध्ये कित्येक वेळा एकांगी विचार कराल आणि असे विचार जवळच्या लोकांना रुचणार नाहीत
महिलांनी ताण कमी करण्यासाठी प्राणायाम आणि ओंकार याचा आधार घ्यावा, व्यापार धंद्यातील बौद्धिक झेप वाढेल
बरेच दिवसांपासून एखादे काम करण्याची इच्छा पूर्ण होईल, पैशाची चणचण दूर झाल्याने हायसे वाटेल.