ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी धनिष्ठ नक्षत्र, परिघ योग, मकर राशीत चंद्राचे संक्रमण आणि कुंभ राशीत त्रिग्रही योग यांचा संयोग होणार आहे.
हिंदू दिनदर्शिकेनुसार, यावर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.08 वाजता सुरू होईल.
महाशिवरात्रीच्या दिवशी चांदीचा नंदी आपल्या घरी आणल्यास आपल्या घरी स्वत: महादेव वास्तव्य करतात असे मानले जाते.
महाशिवरात्रीच्या दिवशी पारद शिवलिंग घरात आणल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते आणि पितृदोष दूर होतो असे सांगितले जाते.
रुद्राक्ष धारण केल्याने सर्व रोग, दोष आणि दुःख दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे.
तुम्ही बेलपत्राचे रोप लावले तर असे म्हणतात की ही वनस्पती जसजशी वाढत जाते तसतशी तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होऊ लागते.