कोणताही निर्णय न घेता जैसे थे परिस्थिती ठेवा. आर्थिक लाभ मिळतील.
कामाच्या संदर्भात अनेक व्यक्तींशी संपर्क साधल्यास कामे मार्गी लागतील.
प्रबळ आत्मविश्वास आणि परिस्थितीचा अचूक अंदाज तुमच्या कामाचा दर्जा सुधारून टाकेल.
महिलांना मुलांकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. समोरच्या माणसांची पारख करण्यात कमी पडाल.
तरुण लोकांनी शिस्त अंगी बाळगावी. दोन पिढ्यांमधील अंतर जाणवेल.
आज समजुतीचे धोरण स्वीकारावे लागेल. बौद्धिक कामे करणाऱ्यांना पर्वणीच असेल.
`एखाद्या विषयात संशोधन करण्याचा वाव मिळेल. वैवाहिक जीवनात तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल.
व्यवसायात नुसते ज्ञान असून चालणार नाही तर ते कोणत्या पद्धतीने वापरावे याचा अभ्यास करावा लागेल.
नको त्यांच्यावर विश्वास टाकाल आणि नेमक्या चांगल्या व्यक्तींच्या सांगण्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.
कामाच्या बाबतीत निरक्षर विवेक ठेवावा लागेल. विद्यार्थ्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी.
व्यवसायात निर्मिती क्षमता चांगली राहील. परंतु, गुंतवणूक करण्यासाठी मात्र चांगले मार्ग सापडणार नाहीत.
आज प्रत्येक बाबतीत थोडी वाट पाहावी लागेल. जोडीदाराचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.