एखाद्या गोष्टीचे निरीक्षण परीक्षण खूप चांगल्या पद्धतीने कराल. आणि त्याचा उपयोग तुम्हाला निश्चित होईल.
भरपूर कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागेल परंतु त्याचे फळही चांगले मिळेल.
घरामध्ये दुरुस्तीचे काम निघू शकते त्यासाठी पैशाची तजवीज करावी लागेल.
प्रेम प्रकरणात जोडीदाराच्या मनासारखे वागण्याचा आटापिटा करावा लागेल तरीसुद्धा मानसिक समाधान मिळणार नाही.
कुटुंबामध्ये नेहमीपेक्षा वातावरण जरा नरम गरमच राहील. त्यामुळे महिलांना सामोपचाराचे धोरण स्वीकारणे भाग पडेल.
कीर्ती प्रसिद्धीच्या मागे धावण्याचा मोह होईल त्यामुळे जशी संधी मिळेल तसे वागण्याचा प्रयत्न राहणार आहे.
कृती ऐवजी वैचारिक गोंधळ जरा जास्तच होतील त्यामुळे चांगली बुद्धी असूनही केवळ या गोष्टीमुळे मागे पडण्याची शक्यता आहे.
वडिलोपार्जित इस्टेटिसंबंधी घेतलेले निर्णय लांबणीवर पडतील. घरामध्ये मंगल कार्य ठरेल.
जवळच्या प्रवासाचे योग येतील. नको त्या ठिकाणी पैसा खर्च झाल्यामुळे थोडी तारांबळ आणि चिडचिड ही होईल.
जोडीदाराला समजून घेतले तरी त्याच्या मनाचा थांग पत्ता लागणार नाही. विद्यार्थी जरा मू डी बनतील .
औषधोपचार घेताना वेगवेगळ्या प्रकारचे औषधे घेतल्यामुळे गुण लवकर येणार नाही. महिलांना जरा नमस्ते घ्यावे लागेल.
आपल्या आवडत्या गोष्टीचा सखोल अभ्यास चांगला कराल. याचा उपयोगही तुम्हाला होईल.