अपाला मिश्रा या तरुण मुलीने यूपीएससी (upsc) परीक्षेत 9 वा क्रमांक मिळवला होता. ती मुलाखतीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवण्यामध्ये टॉपर होती. मुलाखतीत तिला 275 पैकी 215 गुण मिळाले होते. अपाला मिश्रा ही मुळची उत्तर प्रदेशमध्ये राहणारी आहे. अपाला ही उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातली आहे. यूपीएससी ची परीक्षा उत्तीर्ण करण्या पूर्वी अपाला डॉक्टर होती. तिने आर्मी कॉलेजमधून बिडीएसची पदवी घेतली होती. यूपीएससी च्या परीक्षेची तयारी करताना अपालाला आधी यश मिळाले नाही. पण तिच्या अथक प्रयत्नाने तिने ही परीक्षा उत्तीर्ण करून दाखवली. पण अपालाने IAS नाही तर भारतीय परराष्ट्र सेवा म्हणगे IFS पद निवडले.