सुख आणि सुविधांचा कारक ग्रह म्हणजेच शुक्राचं राशी परिवर्तन 7 जुलै रोजी होणार आहे.
शुक्राचं संक्रमण कर्क राशीत रविवारी पहाटे 04 वाजून 39 मिनिटांनी होणार आहे.
शुक्र ग्रहाच्या संक्रमणाने वृषभ राशीच्या लोकांच्या धनसंपत्तीत वाढ होणार आहे.
या काळात तुम्ही तुमच्या व्यवसायातून अधिक पैसे कमावू शकता. तसेच, नोकरदार वर्गाला नोकरीच्या अनेक संधी मिळतील.
तुमच्या सुख-समृद्धीत वाढ होईल.
तुमच्या यशात चांगली प्रगती दिसून येईल. दांपत्य जीवनात अधिक गोडवा वाढेल.
परदेशी जाण्याची संधी तुम्हाला या काळात मिळू शकते.
जोडीदाराच्या सहकार्याने तुमची अनेक कामे सहज शक्य होतील.
या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबियांच्या तसेच तुमच्या सुख-सुविधांवर अधिक लक्ष द्याल.
शुक्र ग्रहाच्या प्रभावाने तुम्हाला नवीन प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीची देखील संधी मिळेल.
शुक्र ग्रहाच्या संक्रमणाने मकर राशीच्या वैवाहिक जीवनातील वाद मिटतील.
नोकरीच्या अनेक नवीन संधी तुमच्यासाठी खुल्या होतील.