नवरात्रौत्सवाला अगदी उत्साहात सुरुवात झाली आहे. आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे. नवरात्रीत प्रत्येक दिवसाला वेगळं महत्त्व आहे. त्यानुसार कन्या पूजन देखील नवरात्रीत केलं जातं. कन्या पूजन नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी केलं जातं. या दिवशी देवीचा उपवास करणारे भक्त घरोघरी कुमारिका कन्यांना बोलावून त्यांना जेवू घालतात. असे मानले जाते की, या दिवशी मुलींना भोजन दिल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. ज्योतिषाने सांगितले की, प्राचीन धार्मिक ग्रंथ आणि पुराणानुसार नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुमारीका पूजन करणं आवश्यक आहे. कारण कन्येची पूजा केल्याशिवाय भक्ताचे नवरात्रीचे व्रत अपूर्ण मानले जाते. कन्यापूजेसाठी सप्तमी, अष्टमी आणि नवमी तिथी योग्य मानली जाते. दहा वर्षापर्यंतच्या मुली कन्याभोजसाठी योग्य आहेत.