नवरात्रीचा उत्सव देशभरात जल्लोषात सुरु आहे. त्यानुसार, देवीचा आजचा चौथा दिवस आहे. आज देवी दुर्गेच्या चौथ्या रुपाची म्हणजेच कुष्मांडाची पूजा केली जाते. शारदीय नवरात्रीच्या चौथ्या दिवशी साधकाचे मन 'गती चक्रात' स्थित असते. सर्वात आधी सूर्योदयापूर्वी स्नान करा तसेच, देवीला हिरव्या रंगाचे वस्त्र धारण करा. तुम्ही देवीला निळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करु शकता. त्यानंतर कलशाची पूजा करा आणि कलशला टिळा लावा. देवीचं ध्यान करुन देवीच्या मंत्राचा जप करा. त्यानंतर, लाल पुष्प, सफेद कमंडल, फळ, सुका मेवा अर्पित करा. देवीची आरती करा आणि त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवा.